जस्ट गंमत (Just Gammat) सिनेमा मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या सिनेमाची कथा खालीलप्रमाणे आहे-
मोहन (संजय नार्वेकर) एक श्रीमंत आसामी आहे ज्याचं लग्न मीरासोबत (स्मिता गोंदकर) झालं आहे. एक दिवस घरी आल्यावर त्याला मीराची जुळी बहीण मोहिनी दुसर्या एका पुरुषासोबत दिसली. या गैरसमज मधून तो तडक घराबाहेर पडतो आणि एक बार मध्ये जातो. तिथे त्याला त्याचा बालपणीचा मित्र अशोक (जितेंद्र जोशी) भेटतो. काही कारणास्तव अशोक पत्नीवर (अदिती सारंगधर) नाखूष आहे. या परिस्थितीत दोन्ही मित्र एकमेकांच्या पत्नींना ठार मारण्याचे आश्वासन देतात. पुढे काय होतं ते या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल.
प्राईम विडिओ वर तुम्ही या सिनेमाचा सहकुटुंब आनंद घेऊ शकता.