फुगे (Fugay) चित्रपटाची कथा आदित्यची (स्वप्नील जोशी) आणि हृषीकेशची (सुबोध भावे) या दोन मित्रांची ही गोष्ट आहे. आईच्या गेल्यानंतर आदित्यच्या कुटुंबीयांसोबतच राहिलेला हृषीकेश, अग्निहोत्री कुटुंबीयांच्या घरातीलच एक सदस्य आहे. शिक्षण, नोकरीनंतर या दोघांचे लग्न करायच आहे आणि त्यासाठी घरातल्यानी आदित्यसाठी जाईला (प्रार्थना बेहेरे) पसंत केले आहे. आदित्य आणि हृषीकेश दोघेही नेहमीच एकत्र राहत आहेत आणि त्यांचे एकमेकांशिवाय पानही हालत नाही. बॅचलर्स पार्टी साठी दोघे गोव्याला जातात. गोव्यामध्ये दारूच्या नशेत हे दोघे तेथील एका ‘गे परेड’ मध्ये सहभागी होतात आणि स्वतःचे फोटोही काढतात. हे फोटो तेथील वृत्तपत्रातही छापून येतात, पुढे काय होते हे या सिनेमात पाहणे रंजक ठरेल.
सिनेमात काम केलेले कलाकार आहेत स्वप्निल जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, मोहन जोशी,आनंद इंगळे, सुहास जोशी, निशिकांत कामत तर स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.
हा सिनेमा प्राईम विडिओ वर तुम्ही पाहू शकता.