या शुक्रवारी म्हणजेच २६ फेब्रुवारीला एक नवा कोरा मराठी सिनेमा मराठी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं नाव आहे 'बेफाम'. या सिनेमामध्ये 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम रेश्मा, म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सखी गोखले-जोशी आणि मराठी सिनेमातील उभारता तारा सिद्धार्थ चांदेकर अभिनय करताना दिसतील.
यांच्या सोबत आपल्याला विद्याधर जोशी, सीमा देशमुख, शशांक शेंडे, कमलेश सावंत, नचिकेत पूर्णपत्रे, हे कलाकार देखील अभिनय करताना दिसतील.
सिनेमाचं दिग्दर्शन कृष्णा कांबळे यांनी केलं असून, सिनेमाची निर्मिती अमोल कागणे यांनी केली आहे. तर विद्यासागर अध्यापक यांनी या सिनेमाची कथा लिहली आहे.
सिनेमाची कथा एका स्ट्रगलर तरुणा भोवती फिरते, ज्याला आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हेच माहीत नाही. हा सिनेमा रसिकांचे मन नक्कीच जिंकेल अशी आशा करूयात आणि फिल्मीगीरी टीमतर्फे बेफाम सिनेमाला शुभेच्छा देऊयात.