धनंजय परश्या आणि सुधीर हे तिघे मित्र. शंतनू हा धनंजयचा धाकटा भाऊ. नोकरीसाठी धनंजय गाव सोडून पुण्याला राहतो आहे. शंतनू हा वैद्यकीय शिक्षण घेत असतो. शांतनूला सुटी असल्यामुळे तो धनंजयकडे पुण्याला येतो.
धनंजयचे घरमालक विश्वास सरपोतदार यांना धनंजयचा भाऊ त्याच्याकडे राहणार हे त्यांना पटत नाही. जास्त भाडे आकारुन ते शंतनूला तिथे राहण्याची परवानगी देतात.
नंतर थोड्याच दिवसांनी आपल्या काकाबरोबर भांडण झाल्यामुळे सुधीर आणि नोकरी गमावलेला परश्या आपले नशीब आजमावण्यासाठी एकामागे एक पुण्याला येतात. अर्थातच त्यांना चोरून धनंजयकडे रहावे लागते. एक दिवस ते चौघे चोरुन घरात राहत असल्याचे बिंग फुटते आणि धनंजयला घर खाली करण्यास सांगतात.
तिथून पुढे ते चौघे घर शोधू लागतात, त्यांना एके ठिकाणी भाड्याच चांगलं घर मिळतं, पण तिथे घरमालकिणीची अट असते की भाडेकरू जोडपेच हवे म्हणून. ही अट ते चौघे कशी पूर्ण करतात. त्यांना किती अडचणी येतात. त्यावर ते कशी मात करतात. या भोवती हे कथानक फिरत.
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित या सिनेमात स्वतः सचिन पिळगांवकर यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या शिवाय अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे , सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे असे एकापेक्षा एक कलाकार आहेत.
प्राईम विडिओ वर हा सिनेमा तुम्ही सहकुटुंब पाहू शकता.