संवेदनशील दिग्दर्शक म्हणून प्रसिध्द असलेले दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आपल्यासाठी लवकरच नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचं नाव आहे ‘साजिंदे’. गजेंद्र अहिरे आपला प्रत्येक सिनेमा हा अतिशय वेगात चित्रीकरण करून पूर्ण करतात हा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. हा सिनेमा देखील याला अपवाद नाही.
या सिनेमाचं पोस्टर त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रदर्शित केलं. या पोस्टर सोबत ते लिहतात की जगातील फिल्म क्षेत्र संपूर्ण ठप्प होतं. ६ जूनला त्यांना या सिनेमाची कल्पना सुचली आणि या चित्रपटाचा प्रवास सुरु झाला. एका निर्मात्याची साथ मिळाली आणि सोबत अजून २१ जण धावून आले आणि हा चित्रपट साकार झाला.