सगळ्यांचा लाडका अभिनेता उमेश कामत आपल्या सगळ्या मराठी प्रेक्षकांसाठी एक नवा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमाच नाव आहे “ताठ कणा”. या सिनेमाचं पोस्टर नुकताच उमेश कामत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर प्रदर्शित केलं आहे. ज्या पोस्टर मध्ये उमेश कामत हे एका डॉक्टरच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या हातात एक एक्सरे आहे. आणि तो एक्सरे तो निरखून पाहत आहेत.
हा सिनेमा भारतीय प्रसिद्ध न्यूरो शल्य विशारद “प्रेमानंद शांताराम रमाणी” यांची बायोग्राफी आहे. प्रेमानंद रमाणी हे गोवा राज्यातील रहिवाशी असून ते लेखक देखील आहेत. त्यांनी न्यूकॅलसमध्ये काम केलं आहे, शिवाय ‘पीएलआयएफ’ च्या न्यूरोस्पिनल सर्जेरी या तंत्रासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद रमाणी सध्या मुंबईतील विलेपार्ले येथील लीलावती रुग्णालयात कार्यरत आहेत. या हॉस्पिटलमध्ये ते वरिष्ठ न्यूरोस्पिनल सर्जन म्हणून कामकाज पाहतात. त्यांच्या राज्यात म्हणजे गोवा इथे त्यांच्या सन्मानार्थ दर वर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
उमेश कामत यांनी या सिनेमाच्या पोस्टर व्यतिरिक्त अजून कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल आणि या सिनेमात उमेश कामत व्यतिरिक्त अजून कोण कोण कलाकार आहेत हे सगळं अजून गुलदस्त्यातचं आहे.
लवकरच उमेश कामत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील आणि या सिनेमात उमेश कामत व्यतिरिक्त अजून कोण कोण कलाकार आहेत हे देखील जाहीर करतील अशी आशा बाळगूया. आणि उमेश कामत यांना त्यांच्या नव्या सिनेमासाठी शुभेच्छा देऊयात.