पैशाची चणचण असलेल्या दोन मित्रांना, गौतम आणि फाल्गुन या दोघांना झटपट पैसा मिळविण्यासाठी 'श्रीमंत बापाची मुलगी खंडणीसाठी पळवून नेण्याची' दुर्बुद्धी सुचते. पण ते त्या श्रीमंत बापाच्या मुलीला पळवून आणल्यावर त्यांना ज्या दिव्याला सामोरे जावे लागते त्या भोवती हे कथानक फिरते.
सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, वर्ष उसगावकर, चारुशीला साबळे यांच्या भूमिका असलेला आणि सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा तुम्ही प्राईम विडिओ वर पाहू शकता.