हा सिनेमा चार वेगवेगळ्या कथांचा आधार घेऊन बनवला आहे. या चार वेगवेगळ्या कथा मराठी चित्रपटसृष्टीतील चार वेगवेगळ्या मोठ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या आहेत. पहिली कथा गजेंद्र अहिरे यांची 'दिल ई नादान' ही आहे, जी मिर्झा गालिब यांच्या प्रसिद्ध गझलमधून प्रेरित आहे.
दुसरी कथा एक होता काउ नावाची विजू माने यांनी दिग्दर्शित केली आहे. खऱ्या प्रेमाला रंग, वंश यांचं बंधन नसते. हा संदेश या कथेतून दिला आहे.
गिरीश मोहिते यांनी चित्रपटाची तिसरी कथा दिग्दर्शित केली आहे, या कथेचं नाव आहे जमीन. ही गोष्ट आम्हांला आमच्या देशात शेतकऱ्यांच्या समस्येवर भाष्य करते.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाची चौथी आणि शेवटची कथा दिग्दर्शित केली आहे. 'मित्र' नावाची . समलैंगिकतेसारखी संकल्पना या कथेतून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
या सिनेमात बरेच मोठे कलाकार आहेत, नीना कुलकर्णी, स्पृहा जोशी, मंगेश देसाई, कुशल बद्रिके.
नेटफ्लिक्सवर हा सिनेमा आपल्या जोडीदारासमावेत तुम्ही पाहू शकता