छोट्या पडद्यावर आपली छाप पाडलेले दोन कलाकार संकर्षण कऱ्हाडे आणि प्रसाद ओक आता एकत्रित मिळून एक नाटक घेऊन येत आहेत. या नाटकाचे नाव आहे ‘तू म्हणशील तसं’.
नाटक एका नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित आहे. एक छानशी निरागस लवस्टोरी असं वर्णन या नाटकाचे करता येईल. या नाटकामध्ये नायक आहे गौरव (संकर्षण कऱ्हाडे) ज्याला प्रमोशन मिळून तो आता सहाय्यक व्यवस्थापक झाला आहे. पण त्याची बायको आदिती (भक्ती देसाई) त्याच ऑफिसमध्ये त्याची बॉस आहे. या अश्या परिस्थिती मुळे त्यांच्यामध्ये काय काय गोंधळ होतो. यावर आधारित हे नाटक आहे.
कच्चा लिंबू आणि हिरकणी यांसारखे दर्जेदार सिनेमे दिग्दर्शित केल्या नंतर आता प्रासाद ओक यांनी नुकताच विश्वास पाटील यांच्या कथेवर आधारीत ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा दिग्दर्शन करायला घेतला आहे. आणि त्यासोबतच हे नाटक म्हणजे प्रसाद ओक यांच्या चाहत्यांना एक पर्वणीच म्हणता येईल.
तर संकर्षण कऱ्हाडे यांनी नुकताच सोनी मराठी वरील एका गायनाच्या रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता. शिवाय आता ते ‘महाराष्ट्रास बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देखील करत आहेत.