Khisa Marathi Short Film (खिसा)

Khisa Marathi Short Film

खिसा या लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात निवड

मराठी चित्रपट यशाची नवनवी शिखरे पादंक्रांत करत असतानाच अजून एका मराठी लघुपटाने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. हा लघुपट आहे ‘खिसा’.

या लघुपटाने अनेक राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवली असून आता हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यास सज्ज झाला आहे.

खिसा या सिनेमाची ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. हा चित्रपट महोत्सव १६ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान गोव्या मध्ये पार पडेल. हा चित्रपट अकोला मध्ये चित्रित केला गेला असून कैलास वाघमारे यांनी या सिनेमाचं लेखन केले आहे.

पी पी सिनेप्रोड्युकॅशन आणि लालटिप्पा यांची निर्मिती असून या सिनेमाचं दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केलं आहे.

खिसा या लघुपटाला ‘इस्तंबूल फिल्म अवॉर्डस २०२०’ मध्ये देखील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट कथानक या पारितोषिकांनी सन्मानित केलं गेलं होतं

मराठी सिनेमा असेच यश संपादन करत राहो ही अपेक्षा ठेवून खिसा या सिनेमाला आपल्या फिल्मीगिरी टीम तर्फे शुभेच्छा देऊयात.

Khisa Short Film Cast-

Cast: Vedant Shrisagar (child artist), Kailash Waghmare, Meenakshi Rathod, Shruti Madhudeep, Sheshpal Ganvir

Producer: PP Cine production, Laaltippa films
Associate Producer: Chetna Bhutani

Stroy and, Screenplay: Kailash Waghmare
Cinematography: Simar Jit Singh

Editor: Santosh K. Maithani
Music: Parijat Chakraborty

Sound Recordist: Kushal Sarda
Colorist: Tapasvi Asija

Production controller: Kishor Vibhute