८० ते ९० च्या दशकातील मुंबई गँगवॉरच्या विळख्यात पूर्णपणे अडकली होती. या संदर्भातले अनेक उल्लेख विविध सिनेमाच्या माध्यमातून आपल्या समोर आले. आता याचं कालखंडातील एक कथा एक थी बेगम या वेब सेरीजच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे.
या वेब सीरीजच दिग्दर्शन सचिन धारेकर आणि विशाल मोधावे यांनी केलं असून सचिन धारेकर यांनीच या वेबसिरीजचं कथानक लिहल आहे.
गँगवॉर मध्ये मारला गेलेल्या आपल्या नवऱ्याच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने एक तरुणी स्वतः या क्षेत्रात उतरते.
ती आपला बदला घेते का ? तीला या सगळ्यामध्ये कोणत्या कोणत्या दिव्यातून जावे लागते ? हे या एक थी बेगम वेबसीरीज मध्ये पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
ही सिरीज एकूण १४ भागांची आहे. तसेच ही मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे. यामध्ये बरेच मराठी कलाकार तुम्हाला अभिनय करताना पाहायला मिळतील. अनुजा साठे ही मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहे. या शिवाय अंकित मोहन, राजेंद्र शिसटकर, विवेक आपटे, वैभव आंबेकर, चिन्मय मांडलेकर, राजू आठवले, अमितराज, अभिजित चव्हाण, अद्वैत दादरकर, सुहास देशपांडे, दीप्ती धोत्रे हे कलाकार या वेब सिरीज मध्ये आहेत.
एमएक्स प्लेअर वर अगदी मोफत तुम्ही ही एक थी बेगम वेब सिरीज तुम्ही पाहू शकता.