सध्या वेबसिरीजचा जमाना आहे. अनेक उत्तमोत्तम वेबसेरीज OTT प्लॅटफॉर्मवर येत आहेत. अश्यातच एका गाजलेल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित एक वेबसेरीज म्हणजे 'गोंदया आला रे'.
१८९७ ची ब्रिटिशकालीन घटना. प्लेगच्या साथीने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. म्हणून इंग्रज सरकारने वॉल्टर रँडला भारतात बोलावून घेतले होते. आणि रँड ने सगळी सूत्रे आपल्या हातात घेत अत्यंत निर्दयपणे प्लेग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजणांची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे त्याच्या विरोधात असंतोष निर्माण होत होता. याच असंतोषातून चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली.
याच कथानकावर आधारित ही १० भागांची वेबसिरीज आहे. ही वेबसिरीज तुम्ही झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
या वेबसिरीज मध्ये अनेक नामवंत कलाकारांनी काम केलं आहे. सुनील बर्वे, भूषण प्रधान, क्षितिज दाते, शिवराज वैचाल, पल्लवी पाटील, आनंद इंगळे, भरत दाभोळकर, अंगद म्हैसकर या कलाकारांनी 'गोंदया आला रे' या वेबसिरीज मध्ये अभिनय केला आहे.
इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेची साक्षीदार असलेली ही वेबसिरीज झी5 वर नक्की पहा