मराठी मधील ही ६ भागांची वेबसिरीज. फोमो या नावावरून काही अर्थबोध होत नाही. कारण हे नाव इंग्रजी आद्य अक्षरांच मिळून शॉर्टफॉम म्हणून बनवलेलं आहे. FOMO - Feelings of missing out.
एकंदरीतच माणूस हा एकदम विचित्र प्राणी आहे. त्याला नेहमी गर्दीत राहायचं असतं. आपण गर्दीतून वेगळे पडलोय ही जाणीवच त्याला खायला उठते. लोकांनी आपल्याला ओळखावं. त्यांच्या सारखेच आणि त्यांच्यातलेच आहोत असं समजावं या अट्टहासापायी स्वतःच अस्तित्व विसरून चेहऱ्यावर मुखवटे घातले जातात, आणि या साऱ्या प्रकारात तो स्वतःलाच विसरायला लागतो.
याचं गोष्टी भोवती या सेरीजच कथानक फिरते. एक रेडिओ स्टेशनचं ऑफिस आहे. त्यामध्ये छोट्या गावातून आलेले समीर आणि रेवती या दोघांच दुःख सारखच आहे. दोघांना देखील तिथे बराच काळ काम करून देखील फारसे कोणी ओळखत नाही.
मग दोघे मिळून एक नाटक करतात. ते नाटक काय आहे त्या साठी तुम्हाला ही वेबसेरीज पहावी लागेल. जी युट्युब (ShudhDesi Marathi Youtube Channel) वर तुम्ही अगदी मोफत पाहू शकता.
यामध्ये रुचिता जाधव, चेतन चिटणीस, पर्ण पेठे, अभिषेक देशमुख हे कलाकार आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील, तर सागर कारंडे सूत्रसंचालकाच्या विशेष भूमिकेत आहे.