विक्की वेलींगकर (Vicky Velingkar) (सोनाली कुलकर्णी) भोवती सिनेमाची गोष्ट फिरते. विक्की आणि विद्या (स्पृहा जोशी) यांची मैत्रीण सृष्टीचा (जुई पवार) खून होतो. हा खून मास्क घातलेली एक व्यक्ती करते. सृष्टी वैज्ञानिक आहे. सृष्टीकडील एक वस्तू त्या खून करणाऱ्या व्यक्तीला मिळवायची असते. या खुनाचा तपास इन्स्पेक्टर संकर्षण साळुंखे (केतन सिंग) करत आहेत. विक्कीच्या मागावर असलेल्या त्या मास्क मॅनपासून वाचवण्यासाठी विक्की तिचा मित्र लकीची मदत घेते.
मास्क मॅन विक्कीच्या मागावर का आहे? मास्क मॅनला नेमकी कोणी वस्तू हवी आहे ?, लकीची विक्कीला मदत होते का ? विक्कीच पुढे काय होते ? या सगळ्याची उत्तरे तुम्हाला सिनेमात मिळतील.
स्पृहा जोशी, जुई पवार, सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा सौरभ वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे.
प्राईम विडिओ वर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.