मुंबईत देशातील विविध कानाकोपऱ्यातून आपली स्वप्नं पूर्ण करायला लोक येत असतात. मग मिळेल तिथे राहून त्यांचा जगण्याचा त्यांचा संघर्ष चालू होतो, राजा (मकरंद देशपांडे) अशांपैकीच एक आहे. कोकणातली आपली घर-जमीन सोडून तो बायकोला आणि मुलांना घेऊन मुंबईला येतो. आपल्या मुलाला खूप शिकवून वकील करायचं हे स्वप्न त्यानं उराशी बाळगलं आहे. टॅक्सी चालवून कसाबसा उदरनिर्वाह करणारा राजा आपल्या मुलाला कॉन्व्हेंट शाळेत घालतो. एकदा गावी गेल्यावर तिथे झालेल्या बोलाचालीत धाकटा भाऊ मुंबईतल्या त्याच्या झोपडपट्टीतल्या घरावरुन बोलतो. तेव्हा चिडलेला राजा झोपडपट्टीतल्या घराला पोटमाळा काढायचा आणि घरातल्या सगळ्यांना इकडे घेऊन यायचं असा मनाशी पक्का विचार करतो. तिथून पुढं काय होत या भोवती हे कथानक फिरत.
हा सिनेमा प्रसिध्द अभिनेते प्रमोद पवार यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात मुकेश ऋषी, मनोज जोशी यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.
नेटफ्लिक्स वर सहकुटुंब तुम्ही या सिनेमाचा आस्वाद घेऊ शकता.