एक मध्यमवयीन मद्यपी (श्रीराम लागू) एका गावात पोहोचला आहे. बसस्टँडवर लोकंजवळ हा मद्यपी "मारुती कांबळे" विषयी चौकशी करत असतो. त्याची बातमी श्री. हिंदुराव धोंडे-पाटील (निळू फुले) पर्यंत पोहचते. हिंदुराव एक साखर सम्राट आहेत. ते त्या मद्यपीला त्याच्या वाड्यात बोलावतो. आणि त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याला राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन देतो. तो मद्यपीला काही थेट प्रश्न विचारतो की तो कोण आहे आणि तो कोठून आला आहे. पण मद्यपी गोंधळ निर्माण करणारी उत्तरे देतो. तो त्याचे नावदेखील सांगत नाही. पुढे काय होत हे या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल.
डॉ श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी ने नटलेला जब्बार पटेल दिग्दर्शित हा अजून एक मास्टरपीस. १९७५ साली प्रदर्शित झालेला तरी अजूनही पहावासा वाटणारा हा सिनेमा हॉटस्टार वर पाहण्यास उपलब्ध आहे