सैराट हा सिनेमा पूर्वार्धात महाविद्यालयीन प्रेमी युगुलांची प्रेमकथा अतिशय रंजक आणी विनोदी पद्धतीने दाखवतो, पण उत्तरार्धा मध्ये मात्र हा सिनेमा आपलं पूर्ण रूप पालटून वास्तववादी जगाचं चित्र आपल्या समोर उभं करतो. हे वास्तववादी चित्र ग्रामीण भागातील राजकारण आणी खोलवर रुजलेल्या जातीपातीच दर्शन आपल्याला घडवते
नागराज मंजुळे या दिग्दर्शकाच्या परिस स्पर्श लाभल्याने हा सिनेमा अधिक सुंदर झाला आहे, या सिनेमातल्या प्रत्येक फ्रेम वर अत्यंत बारकाईने काम केलेलं आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवत राहत