एक अंध उद्योजक आहे. ज्याला आपल्याला कोणीतरी मारणार आहे असे सतत आभास होत असतात. या विषया भोवती फिरणार चित्रपटाचं कथानक तुम्हाला अचानक एक आश्चर्यकारक जोरदार धक्का देऊन जातं. काय आहे तो धक्का हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पहावा लागेल. युट्युब वर हा सिनेमा उपलब्ध आहे.
अजय फणसेकर दिग्दर्शित हा सिनेमा मराठीतील एक वेगळा प्रयोग आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असून आनंद अभ्यंकर आणि दिलीप कुलकर्णी यांनी देखील या सिनेमात अभिनय केला आहे.