कट्यार काळजात घुसली (Katyar Kaljat Ghusali) हा सुबोध भावे दिग्दर्शित एक संगीतमय प्रवास आहे. विश्रामपूरच्या राजांकडे अनेक गायकांना राजाश्रय असतो. राजगायक पंडित भानुशंकर शास्त्री (शंकर महादेवन) हे देखील राजाश्रय मिळलेल्यांपैकीच. मिरजेला मैफलीला गेले असताना त्यांची गाठ खांसाहेबांशी (सचिन पिळगावकर) यांच्याशी पडते. दोघांची मैत्री होते. शास्त्री खांसाहेबांना विश्रामपूरला आणून त्यांची राहायची व्यवस्था करतात. प्रत्येक दसऱ्याला राजा राजगायकासाठी एक मोठी स्पर्धा भरवत असतो. जो जिंकेल त्याला एक कट्यार भेट मिळते. शिवाय त्या कट्यारीने केलेला एक खून माफ असतो.
भानुशास्त्रींसारख्या श्रेष्ठ गायकाला आव्हान देईल असा कुणीच नसतो. पण विश्रामपूरला आल्यावर खांसाहेब त्यांना गायकीचे आव्हान देतात. पण पंडितजी जिंकतात. हा सिलसिला बरीच वर्षे चालतो. खांसाहेब हा दरवर्षी अपमान सहन करत असतात. आणि त्यांची मैत्री हेवा, द्वेष, असुया यामध्ये बदलते. पुढे काय होते हे सिनेमात पाहाणं रंजक आहे.
सिनेमात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर, स्वप्नील राजशेखर यांसारखे कसलेले अभिनेते आहेत.
हा सिनेमा ZEE5 इथे तुम्हाला पाहायला मिळेल.