रेणू बक्षी (तेजस्विनी पंडित) एका मोठ्या कंपनीच्या मालकाची श्री बक्षी (प्रदीप वेलणकर) यांची मुलगी आहे . रती (सोनाली खरे) ही बक्षी यांची मोठी मुलगी आहे, रतीला बक्षीनी तिच्या मादक पदार्थांच्या व्यसनामुळे कुटुंबापासून दूर केले आहे. पण ती रेणूंच्या संपर्कात आहे.
बक्षीच्या कंपनीत काम करत असलेला राजस जावडेकर (प्रसाद ओक) हा एक धडपडणारा अनाथ तरुण रेणूच्या आयुष्यात येतो. रेणू त्याच्या प्रेमात पडते. दोघे लग्न करतात, राजस घर-जावई बनतो. काही दिवसांनी रेणूचा गर्भपात होतो आणि ती नैराश्याने ग्रासते. तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो.
रेणूवर औषधोपचारांवर सुरू आहे आणि बदल आणि विश्रांती घेण्यासाठी राजस तिला 7, रोशन व्हिला येथे आणतो. इथून पुढील कहाणी तुम्हाला चित्रपट पाहून कळेल.
प्रसाद ओक, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका केल्या आहेत, तर अक्षय दात यांचं दिग्दर्शन आहे.
प्राईम विडिओ आणि YouTube वर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.