लोकेश गुप्ते दिग्दर्शित एका नव्या सिनेमाची ( डेट भेट ) मुहूर्तमेढ लंडन मध्ये रोवली गेली. या सिनेमामध्ये बरीच मोठी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. या सिनेमात सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर यांच्या सोबत हेमंत ढोमे हे देखील आपल्याला अभिनय करताना दिसतील.
सिनेमाची निर्मिती अमेय खोपकर आणि स्वाती खोपकर यांची आहे. मराठी सिनेसृष्टी कात टाकत आहे मागील काही काळात बरेचसे सिनेमे हे परदेशात शूट झाले, ही एक आनंदाची बाब आहे. कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या सिनेसृष्टीला आता नवीन उभारी मिळत आहे.
या सिनेमाच्या योगायोगाबद्दल या सिनेमाची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगते की, हा तिचा तिसरा सिनेमा आहे जो लंडन मध्ये शूट होत आहे. हेमंत ढोमे यांच्या सोबत देखील हा तिचा तिसरा सिनेमा आहे. शिवाय लोकेश गुप्ते दिग्दर्शन करत असलेला देखील हा तिसरा सिनेमा आहे. अश्या पध्दतीने या सिनेमाने एक प्रकारची हॅट्ट्रिक साधली आहे.
डेट भेट (Date Bhet) या सिनेमाला खूप छान यश मिळो या शुभेच्छा फिल्मीगिरी टीम आणि वाचक मंडळी तर्फे देऊयात.
Cast:
Sonalee Kulkarni, Hemant Dhome & Santosh Juvekar
Directed By: Lokesh Vijay Gupte
Written by : Ashwini Shende Bagwadkar
DOP : Pradeep Khanvilkar
Produced By: AVK Entertainment, Ameya Khopkar, Swati Khopkar, Ninad Nandkumar, Battin Tabrez Patel
Movie releases in 2021