दिगु टिपणीस (निळू फुले) एक पत्रकार आहे. ज्याने कामगार संघटना आणि राजकारण्यांमधील संबंधाचे जाळे उघड केले आहे. मुंबईच्या उद्योजक क्षेत्राशी निगडित महाराष्ट्रातील राजकीय भ्रष्टाचार हा कथानकाचा मुख्य भाग आहे. या चित्रपटाची सुरुवात विधानसभा अधिवेशनात होते जिथं मुख्यमंत्री (अरुण सरनाईक) यांना तातडीच्या आवाहनाला उपस्थित राहण्यासाठी जोरदार चर्चा करावी लागते. एक हितचिंतक मुख्यमंत्र्यांना फोन करून माहिती देतो की त्यांच्याच पक्षाचे काही सदस्य गुप्तपणे त्यांना आपल्या खुर्चीवरून काढून टाकण्याचा विचार करीत आहेत. या फोनमुळे राज्यातील राजकीय परिस्थिती बदलते आणि पडद्यामागील बर्याच उपक्रम सुरू होतात. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांना (श्रीराम लागू) संशय व्यक्त करतात, आणि पुढे एक राजकिय नाट्य उभं राहतं.
निळू फुले, डॉ श्रीराम लागू, अरुण सरनाईक, रीमा लागू, मोहन आगाशे, नाना पाटेकर असे दिग्गज कलाकार या सिनेमात आहेत.
१९७९ साली प्रदर्शित झालेला हा जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमा आजही जुना वाटत नाही.
युट्युब वर हा सिनेमा दोन भागामध्ये तुम्ही पाहू शकता.