सिनेमाची कथा आहे यश दीक्षित आणि त्याची बायको काव्या दीक्षित या दोघांची. यश दीक्षित (विजय आंधळकर) आणि काव्या (गौरी निगुडकर) हे आपलं काम भल आणि आपण भल असे कुणाच्या अध्यात मध्यात नसलेले जोडपे. त्यांना रेवा नावाची लहान मुलगी आहे. त्यांच्या आयुष्यात एक घटना घडते. त्यांच्या घरी काम करणाऱ्या आशा (अनुश्री जुन्नरकर) हिचा अपघाती मृत्यू होतो. त्यात यश अडकतो. काव्याची त्याला सोडविण्याची धडपड सुरू होते तिला रिया पंडित (पल्लवी पाटील) या त्यांच्या मैत्रिणीची साथ मिळते. त्यानंतर न्यायालयीन लढा, असा या सिनेमाचा प्रवास आहे.
गौरी निगुडकर, विजय आंदळकर, पल्लवी पाटील, रुची जाईल, जयवंत वाडकर अभिनित या सिनेमाचं दिग्दर्शन शंख राज्याध्यक्ष यांनी केलं आहे.
प्राईम विडिओ वर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.